आमदार विजय (भाई) गिरकर व नगरसेविका शैलेजा विजय गिरकर यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी – कांदिवलीच्या वतीने कदमवाडी मैदान, के.टी.सोनी मार्ग, लिंक रोड जवळ, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०००६७ येथे दिनांक २९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत कोकणचे सुपुत्र कविवर्य मंगेश पाडगावकर नगरीत कोकणचो भव्य मालवणी जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
जत्रोत्सवाचे ९ वे वर्ष असून कोकणातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे, ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे, अफाट समुद्र किनारा, हाऊस बोट, स्कुबाडायव्हिंग व दुर्मिळ वनौषधींचा साठा या संबधी प्रदर्शन व माहिती देवून पर्यटनासाठी मुंबईकरांना कोकणाकडे आकर्षित करावे व कोकणातील उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दयावी हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
या जत्रोत्सवात १०० फुट लांबीचे कोकणातील किल्ल्याचे प्रवेश द्वार उभारून कोकणातील उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीचे, दशावतारी नाटक, भजन स्पर्धा,शक्तीतुऱ्यांचा सामना, लावणी, मराठी वाद्यवृंद, स्थानिक मुलांच्या नृत्य स्पर्धा, महिलांचे कार्यक्रम, बालनगरी आदी कार्यक्रमाबरोबरच कोकणाच्या पर्यटनावर व विकासावर प्रमुख पाहुण्यांचे व तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे निसर्ग रम्य कोकणातील किल्ले, ऐतिहासिक मंदिरे, समुद्र किनारे इत्यादींची चित्रफित (Documentry) दाखवण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे कोकणातील उत्पादनाच्या धारकांनी व व्यापाऱ्यांनी संजय बाविस्कर – ९८२०७७८८२४ , अविनाश धुरी – ९९६७३३४७१८ यांच्यांशी संपर्क साधावा. सर्व नागरिकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जत्रोत्सव प्रमुख संजय बाविस्कर यांनी केले आहे.