JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई — कामगार संघटना (युनियन) या प्रत्येक आस्थापनात असायला हव्यात. त्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी युनियनने सजग राहिले पाहिजे. परंतु संस्थाही जगली पाहिजे याकडे लक्ष द्यायला हवे, पण असे करताना कोणत्याही युनियनने त्या त्या आस्थापना आणि संस्थांना वेठीस धरू नये, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल बस आगार येथे बेस्ट उपक्रमाच्या ग्राहक सेवा ई-प्रभाग कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यालयाच्या उद्घाटनाला तीन वर्षे का लागली, असा सवालही त्यांनी केला. प्रशासनानेही नव्या संकल्पना राबवून बेस्टला सक्षम करण्याकडे वाटचाल केली पाहिजे, असे रावते म्हणाले.
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बेस्ट उपक्रमाच्या सेवेचा गौरव केला. बेस्टने टाटा कंपनीकडून वीज खरेदी करून ती ग्राहकांना स्वस्तात देण्यापेक्षा ही बेस्टने स्वतःच वीज निर्मितीत उतरावे असे आवाहन वायकर यांनी केले. स्थायी समितीचा अध्यक्ष असताना बेस्टने वीज निर्मिती करावी यासाठी मी प्रयत्न केला होता. मात्र राजकीय कारणास्तव हे काम झाले नाही. परंतु आज रावते आणि मी आपणास संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. बेस्टने स्वतः वीज निर्मिती करून ग्राहकांना आणखी स्वस्तात वीज द्यावी, असेही वायकर म्हणाले.यावेळी समिती अध्यक्ष दुधवडकर, महाव्यवस्थापक जगदीश पाटील, नगरसेविका यामिनी जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment