पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्षभरात तीस देशांना भेटी - १२० करार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 January 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्षभरात तीस देशांना भेटी - १२० करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षभरात तीसपेक्षाही अधिक देशांना भेटी देऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या वर्षाच्या अखेरीस मोदींनी रशिया आणि अफगाणिस्तानला दिलेली भेट अन्‌ अचानक पाकिस्तानमध्ये जायचा घेतलेला निर्णय त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाचे द्योतक असल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. मोदींनी आतापर्यंत विविध देशांना भेटी देऊन 120 करार केले आहेत, यामध्ये प्रामुख्याने संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्राचा समावेश होतो. 

मोदींनी सेशल्स, मॉरेशियस आणि श्रीलंका या तीन देशांना भेटी देत आपल्या परदेश दौऱ्यांचा नारळ फोडला होता. भारतीय सागरी क्षेत्रामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावास शह देण्यासाठी मोदींनी या देशांचा दौरा केला होता. श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये मोदी यांनी जाफनाला भेट दिली होती. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा केला होता, तोही कमालीचा यशस्वी ठरला. त्यांच्या या भेटीमध्ये 20 करार करण्यात आले होते, यातील एक राफेल विमानाच्या खरेदीशी संबंधित होता. 

यावर्षी मे महिन्यात चीनला भेट देऊन मोदींनी मुत्सद्देगिरीची चमक दाखविली होती, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाला भेट देऊन सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. चीन भेटीमध्ये शी जिनपिंग यांनी केलेले मोदींचे स्वागत जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. चीनसोबत 24 करार करून मोदींनी मास्टरस्ट्रोक मारला होता. जी-20 देशांच्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मोदींनी रशियाचाही दौरा केला होता. याच भेटीत त्यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशीही चर्चा केली होती. 

देश         दिनांक       करार श्रीलंका      14 मार्च       4
फ्रान्स       12 एप्रिल     20
चीन        14/16 मे     24
द. कोरिया    18/ 19      7
सिंगापूर     23/25नोव्हेंबर  10
रशिया      23/ 24 डिसेंबर 16
मोदींचे परदेश दौरे.... 
  • सेशल्स...10/ 11 मार्च
  • मॉरिशिअस...11/13 मार्च
  • श्रीलंका...13, 14 मार्च
  • सिंगापूर...29 मार्च
  • फ्रान्स....9,12 एप्रिल
  • जर्मनी... 12, 14 एप्रिल
  • कॅनडा...14,16 एप्रिल
  • चीन.... 14,16 मे
  • मंगोलिया...16,17 मे
  • दक्षिण कोरिया....18,19 मे
  • बांगलादेश....6,7 जून
  • उझबेकिस्तान....6 जुलै
  • कझाकस्तान....7 जुलै
  • रशिया.....8,10 जुलै
  • तुर्केमेनिस्तान....10,11 जुलै
  • किरगिस्तान...12 जुलै
  • ताजिकिस्तान....12,13जुलै
  • संयुक्त अरब अमिरात...16,17 ऑगस्ट
  • आयर्लंड....23 सप्टेंबर
  • अमेरिका....24,30 सप्टेंबर
  • ब्रिटन...12,14 नोव्हेंबर
  • तुर्कस्तान....15,16 नोव्हेंबर
  • मलेशिया.... 21,22 नोव्हेंबर
  • सिंगापूर.... 23,25 नोव्हेंबर
  • फ्रान्स.....30 नोव्हेंबर 1 डिसेंबर
  • रशिया...23,24 डिसेंबर
  • अफगाणिस्तान, 25 डिसेंबर
  • पाकिस्तान...25 डिसेंबर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad