मुंबई / JPN NEWS.in महापालिकेच्या क्षयरोग रुग्णालयातील क्षयग्रस्त कर्मचाऱ्यांना 50 रुपये पोषण आहार भत्ता देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे. फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तो मिळणार आहे.
क्षयरोग रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा क्षयरुग्णांशी संबंध येतो. यामुळे त्यांना क्षयरोगाची लागण होते. नियमाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना आजार बरा होईपर्यंत भरपगारी सुट्टी मिळते. तसेच आजार काळात त्यांना पोषण आहार मिळावा म्हणून पालिकेने दररोज 50 रुपये पोषण आहार भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यासाठी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मासिक 150 ते 190 रुपये भत्ता बंद करण्यात येणार आहे. सात वर्षांत 47 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून वर्षभरात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment