मुंबई / JPN NEWS.in / 2 Jan 2016मध्य रेल्वेवरील स्थानकांवर 40 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. या सरकत्या जिन्यांचे काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेलविकास कॉर्पोरेशन(एमआरव्हीसी) यांच्यामार्फत होणार आहे. ठाणे स्थानकात सर्वाधिक 6 सरकते जिने असणार आहेत. तर 32 स्थानकावर फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे.
सध्या मध्यरेल्वेवर दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकावर प्रत्येकी दोन आणि विक्रोळी स्थानाकात एक असे एकूण 9 सरकते जिने आहेत.आता अजून मध्यरेल्वेच्यावतीने 23 आणि एमआरव्हीसीच्यावतीने 17 सरकते जिने लावण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर डॉकयार्ड येथे एक,वडाळा येथे तीन आणि मानखुर्द येथे दोन सरकते जिने लावण्यात येणार आहेत.या स्तानकावर एमआरव्हीसीच्या माधयमातून सरकते जिने लावण्यात येणार असल्याची माहिती मध्यरेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.
कुर्ला, डॉकयार्डरोड, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, सानपाडा, बेलापूर, तुर्भे, मस्जिद,खारघर, नेरुळ, जुईनगर, वाशी, कॉटनग्रीन या स्थानकावरील 32 फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment