भुजबळांच्या संस्थेचा भूखंड आज ताब्यात घेणार
मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क / www.jpnnews.in
मुंबई महानगर पालिकेचीे मोकळ्या भुखंडाची पॉलिसी मुख्यमंत्र्यानी रद्द केल्यावर पालिकेने मोकळे भूखंड ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. नोटिस दिलेल्या 36 पैकी छगन भुजबळ यांच्या आणि नागपाड़ा येथील एका शिक्षण संस्थेने न्यायालायात धाव घेतली. परंतू न्यायालयाने दिलासा दिला नसल्याने हे दोन्ही भूखंड आज शुक्रवारी ताब्यात घेणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
मुंबईमधील 216 मोकळ्या भुखंडा पैकी 36 भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने नोटिस बजावली आहे. तसेच महापालिकेने भूखंड धारक संस्था, व्यक्ति न्यायालयात जाउन स्टे मिळवू नए म्हणून क्यावेट दाखल केले आहे. महानगर पालिकेने नोटिस बजवालेल्या 36 भूखंडापैकी 34 भूखंड ताब्यात घेतले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मुंबई एजुकेशन ट्रस्ट आणि नागपाड़ा येथील एक शैक्षणिक संस्था न्यायालयात गेले आहेत. या प्रकरणी न्यायालयामधे झालेल्या सुनवाई नंतर पालिका आपले भूखंड परत घेवु शकते असे म्हटल्याने पालिका शुक्रवारी या दोन्ही संस्थांकडून परत घेणार आहेत अशी माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.