मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
मुंबईमधील मोकळ्या भुखंडाबाबत पॉलिसीचा मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करण्याचे निर्देश दिल्या नंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशाने 35 भूखंडधारक संस्थाना नोटिस बजावली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मोकळ्या भुखंडावर कारवाई करण्यास आयुक्तांनी सोमवार पासून सुरुवात केली आहे. 235 भुखंडापैकी 216 भूखंडधारकांना नोटिस बजवाल्या जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 35 भूखंडधारकाना नोटिस बजावण्यात आल्या असल्याची माहिती महापालिकेकडून उपलब्ध झाली आहे.
यामधे प्रियदर्शिनी पार्क, नेपियन्सी रोड (मलबार हिल रेसिडन्स फोरम), हॉर्निमल सर्कल गार्डन (हॉर्निमल सर्कल गार्डन ट्रस्ट ), सीपीआय गार्डन, कफ परेड (द कफ परेड रेसिडन्स असोसिएशन ),महेश्वरी उद्यान, माटुंगा (लार्सन ऍण्ड टुब्रो ), माऊंट मेरी रोड गार्डन, वांद्रे (माऊंट मेरी रोड ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट)- साधू वासवानी गार्डन, वांद्रे-पश्चिम (कमला रहेजा फाऊंडेशन)- मदर तेरेसा मैदान, खार (विलिंग्टन कॅथलिक जिमखाना), जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगण, वांद्रे-पश्चिम (मुंबई एज्युकेशन ट्रस्ट)- वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड गार्डन (ताज लॅण्ड एण्ड)- कृष्णराव राणे मैदान, जुहू (इस्कॉन) या भुखंडाचे करार संपले आहेत. तसेच ज्याना भूखंड मिळाले परंतू अश्या संस्थानी विकास केला नाही अश्या संस्थानाही नोटिस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सत्ताधारी शिवसेनेने अद्याप भूमिका घेतलेली नाही - तृष्णा विश्वासराव
महानगरपालिकेने मोकले भूखंड ताब्यात घेण्याचे जाहिर करताच भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील भूखंड परत दिले आहेत. भाजपा पुढाकार घेत असताना शिवसेना नेत्यांनी आपल्या ताब्यातील भूखंड महापालिकेला परत करण्याबाबत काही भूमिका घेतली आहे का असे विचारले असता सेनेने याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पॉलिसी चांगली आहे यामुले मोकळ्या जागेवर अतिक्रमण होणार नाही आणि लोकाना चांगल्या सुविधाही मिळू शकतात असे सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. ज्या 216 लोकाना नोटिस बजवाल्या जाणार आहेत त्यामधे मला किंवा माझ्या संस्थेला भूखंड दिला नसताना नोटिसीच्या यादीत माझेही नाव टाकण्यात आले आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. माझे राजकीय भविष्य खराब करण्याचा डाव असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले. मला भूखंड दिला नसताना माझे नाव या यादीमधे टाकल्याने विश्वासराव यांनी संताप व्यक्त करून संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांना पत्र पाठवत असल्याचे विश्वासराव यांनी सांगितले.