मुंबई / अजेयकुमार जाधव / http://www.jpnnews.in
बिहार, झारखंड, ओरिसा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात धनगर समाजाला एस टी चे सर्टिफिकेट मिळावे या मागणीसाठी "ऑल इंडिया धनगर समाज महासंघ"या संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात २९ जानेवारी २०१६ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुंडेवार बनसोडे, श्रावण वाकसे, गणेश बुधे, जयश्री श्रावण वाकसे, आप्पासाहेब आकाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी चार वेळा आश्वासन देवूनही अद्याप कारवाई होत नसल्याने जो पर्यंत धनगर समाजाला एस. टी. चे सर्टिफिकेट देण्याचा निर्णय होत तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment