JPN NEWS ( Voice Of Citizens ) JPN NEWS.in
मुंबई - मुंबईतील 136 वर्षे जुना हँकॉक पूल येत्या रविवारी म्हणजेच 10 जानेवारील पाडला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासननं एकत्रितपणे हा पूल तोडणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेवर 18 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळा ते सीएसटीपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळं 100 हून अधिक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
या काळात बेस्टच्या ज्यादा बसेस भायखळा आणि सीएसटी दरम्यान सोडण्यात येणार आहेत. तसेच 8 ते 10 जानेवारी या तीन दिवसात लांब पल्ल्याच्या 42 गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटीशांनी 1879 साली हँकॉक ब्रिज बांधला. या ब्रिजचा अडथळा येत असल्यानं लोकलच्या वेगावर मर्यादा येत होती. तसेच ब्रिजची उंचीही कमी असल्यानं ट्रॅकची ऊंचीही वाढवता येत नव्हती. त्यामुळं या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते.
9 जानेवारीला या गाड्या रद्द :
पंढरपूर - सीएसटी मुंबई पॅसेंजर
साईनगर शिर्डी - सीएसटी मुंबई पॅसेंजर
सोलापूर - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
नागपूर - सीएसटी मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
अमरावती - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
लातूर - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस - सीएसटी मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस
गोरखपूर - सीएसटी मुंबई स्पेशल
साईनगर शिर्डी - सीएसटी मुंबई पॅसेंजर
सोलापूर - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
नागपूर - सीएसटी मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
अमरावती - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
लातूर - सीएसटी मुंबई एक्स्प्रेस
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस - सीएसटी मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस
गोरखपूर - सीएसटी मुंबई स्पेशल
10 जानेवारीला या गाड्या रद्द :
सीएसटी मुंबई - भुसावळ पॅसेंजर
सीएसटी मुंबई - पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - नागपूर
सीएसटी मुंबई - पुणे इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोयना एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस
सीएसटी मुंबई - नागपूर
No comments:
Post a Comment