एक रुपयाच्या 160 दशलक्ष नोटा चलनात आणल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 January 2016

एक रुपयाच्या 160 दशलक्ष नोटा चलनात आणल्या

मुंबई / JPN NEWS.in  - अर्थमंत्रालयाने मागील दोन वर्षांमध्ये एक रुपयाच्या 160 दशलक्ष नोटा चलनात आणल्या असल्याची माहिती सरकारतर्फे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) दिली आहे. एक रुपयाच्या नोटा तब्बल दोन दशकांनंतर प्रथमच चलनात आणल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाषचंद्र अगरवाल (दिल्ली) आणि मनोरंजन रॉय (मुंबई) यांनी आरटीआय अंतर्गत मागील 20 वर्षांत चलनात आणलेल्या एक रुपयाच्या नोटांची माहिती अर्थमंत्रालयाकडे मागितली होती. त्यांना दिलेल्या उत्तरात एक रुपयाच्या 160 दशलक्ष नोटा मागील दोन वर्षांत चलनात आणल्या असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad