वडाळ्यातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पथनाट्याद्वारे निदर्शने - 1 फेब्रुवारीला 'प्रतिकार मोर्चा' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2016

वडाळ्यातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पथनाट्याद्वारे निदर्शने - 1 फेब्रुवारीला 'प्रतिकार मोर्चा'

मुंबई / जेपीएन न्यूज नेटवर्क /  www.jpnnews.in
मुकेश श्रीकृष्ण धावडे
रोहित वेमुला याला योग्य न्याय मिळाला पहिजे यासाठी (ता.1) फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 11 वा. 'जस्टीस फॉर रोहित - जॉईट अक्शन कमिटी'' मुंबई च्या माध्यमातून रोहित च्या शहादतेला सलाम करत 'प्रतिकार मोर्चा' भायखळा पूर्व येथील राणीबाग ते विधानभवन यादरम्यान काढण्यात येणार आहे. यात रोहित वेमुला याला न्याय मिळवा या हेतून मागण्या मांडण्यात येणार असल्याचे वडाळा पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जोरदार निदर्शने करीत सांगितले असून  मुंबईतील निर्मला निकेतन, टाटा ईनस्टीटयुट,मुंबई विद्यापिठ, आयआयटी पवई, सिद्धार्थ महाविद्यालय आदि महाविद्यालयात देखील पथनाट्याद्वारे निदर्शने करण्यात आली. 

शैक्षणिक संस्थांमध्ये ब्राह्मण्यवादी विचारांचे विष पेरले जात आहे. शिक्षण संस्था या ज्ञानाचे केंद्र असायला हवे होते. पण त्याउलट विद्यार्थ्यांचा आवाज आणि संघर्ष चिरडला जात असल्यानेच रोहित वेमुला यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. मात्र दलित - दलित्तेतर भांडण नाही तर वैदिक हिंदू विचारधारा विरुद्ध जातीविरोधी विचारधारा यामधला शतकांपासून चालत आलेला संघर्ष आहे. रोहितचा संघर्ष सुद्धा याच युद्धाचा एक भाग होता. आणि तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिगरबाज पद्धतीने लढला. हाच संघर्ष पुढे नेण्यासाठी सर्व विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, आंबेडकरवादी पुरोगामी व लोकशाहीवादी संघटना एकत्रित येऊन 'जस्टीस फॉर रोहित - जॉईट अक्शन कमिटी'' मुंबई ' स्थापन केली आहे. ज्यात अनेक नवनवीन विद्यार्थी, सामाजिक, राजकीय संघटना जोडल्या जात आहेत.                                    

प्रमुख मागण्या 
1) केंद्रिय मंत्री बंडारू दत्तात्रय व स्मृती इराणी, हैद्राबाद विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पा राव व मुख्य प्रा. आलोक पांड्ये, स्थानिक आमदार रामचंद्र राव,  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राज्य अध्यक्ष सुशील कुमार यांना एससी, एसटी अट्रोसिटी कायद्यांतर्गत त्वरित अटक झालीच पाहिजे. 
2) पी. अप्पा राव यांना कुलगुरू पदावरून तत्काळ काढण्यात यावे. 
3) हैद्राबाद विद्यापीठाने रोहितच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि त्याच्या कुटुंबाला रु. 50 लाखाइतकी भरपाई दिली पाहिजे. 
4) रोहितच्या फेलोशिपची न दिलेली रक्कम त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावी 
5) या केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुकी करण्यात यावी इत्यादी मागण्या या मोर्चा दरम्यान करण्यात येणार आहेत.      

Post Bottom Ad