मुंबई / JPN NEWS.in / 1 Jan 2016
नववर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या तळीराम चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यात ७0५ तळीराम चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मुंबईत ९0 ठिकाणी नाकाबंदीसाठी २५0 अधिकारी आणि २,५00 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ७0५ तळीराम चालकांना पकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई केल्याचे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
उत्तर आणि पूर्व मुंबईत सर्वाधिक कारवाई झाली. मागील वर्षी ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यात ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करताना विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली. १ हजार ९0६ दुचाकीस्वारांना पकडण्यात आले. त्याचप्रमाणे १ हजार १३५ नो पार्किंग करणाऱ्या आणि ५९ बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
No comments:
Post a Comment