मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ११ डिसेंबर –
शरद राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन मध्ये कामगार आणि कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शरद राव आपल्या नापास मुलाला कामगारांच्या डोक्यावर नेतृत्व लादत आहेत. यामुळे बेस्ट कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बेस्ट वर्कर्स युनियन अकार्यक्षम ठरत असल्याचा आरोप करत युनियनचे काम बंद करून रयतराज कामगार संघटनेचे काम करणार असल्याचे युनियनचे माजी अध्यक्ष उदय आंबोणकर यांनी पत्रकार परिषदेत केले. बेस्ट वर्कर्स युनियन मधील बहुतेक सर्वच पदाधिकारी रयतराज कामगार संघटनेचे सभासद झाल्याने लवकरच बेस्ट वर्कर्स युनियन आणि सत्तधारी शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेला बेस्ट मधून हद्दपार करून बेस्ट उपक्रमाला आणि कामगाराला वाचवण्याचा प्रयत्न करू असा आशावाद पत्रकार व युनियनच्या अध्यक्षा जयश्री खाडीलकर यांनी व्यक्त केला.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत उदय आंबोणकर यांनी बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार सेना या दोन्ही संघटना कामगारांच्या हितासाठी काम करत नसल्याचा आरोप केला. बेस्ट मधील कैझन पास, ट्रायम्याक्स, व्हर्व अश्या सर्व घोटाळ्यांना या दोन्ही युनियन मंजुरी दिल्याने बेस्ट उपक्रम आर्थिक डबघाईला आल्याचे आंबोणकर यांनी सांगितले. २३ वर्षे बेस्ट कामगार युनियनचे काम केल्याचा अनुभव पाठीशी घेवून बेस्ट कामगारांना न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी रयतराज कामगार संघटनेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे आंबोणकर यांनी सांगितले. रयतराज संघटनेचे १४ डिसेंबर पासून सर्व २६ डेपोमध्ये सभासद अभियान सुरु करण्यात येणार असून लवकरच हि संघटना मान्यताप्राप्त संघटना बनेल असा विश्वास आंबोणकर यांनी व्यक्त केला. यावेळी रयतराज कामगार संघटनेच्या परिवहन समितीच्या अध्यक्षपदी उदय आंबोणकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच संघटना सराव परिवहन सेवा देणाऱ्या उपक्रमामध्ये काम करणार असल्याचे जयश्री खाडिलकर यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment