मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015 वरळी येथील महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्याहस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गृहराज्यमंत्री (ग्रामीण) प्रा.राम शिंदे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी.बक्षी, पोलीस आयुक्त अहमद जावेद, पोलीस गृह निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश माथुर, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) हिमांशु रॉय, अपर पोलीस आयुक्त आर. डी. शिंदे, पोलीस उपआयुक्त जयकुमार आदी मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत वरळी येथे पोलिसांसाठी प्रकार-2 ची 108 तर प्रकार-4 ची 28 निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या बांधकामाचे क्षेत्रफळ 1 लाख 21 हजार 909 चौ.फूट असून या प्रकल्पाची किंमत रु.2880 लाख इतकी आहे. पोलीस चोवीस तास कार्यरत असतात, त्यांना निवासस्थानाबरोबरच मुलभूत सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. | |
Post Top Ad
29 December 2015
Home
Unlabelled
पोलिसांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री
पोलिसांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment