मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ९ डिसेंबर
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या वर्षभराच्या कालावधीत राज्यात एसटीच्या तिकिटात अपहार केल्याची तब्बल ६१९० प्रकरणे उघड झाल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपा आमदार आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली.राज्यात एसटी च्या तिकिटात मोठ्याप्रमाणत अपहार होत असल्याची शंका उपस्थित करत याबाबतचा तारांकित प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले की सन २०१४-१५ या कालावधीत सुरक्षा व दक्षता खात्या मार्फत वाहकाच्या अपहाराची ३६२३ प्रकरणे व वाहतूक खात्यमार्फत २४६७ अशी एकूण ६१९० प्रकरणे उघडकीस आली आहेत. वर्षभरात २७० वाहतूक निरीक्षक व २५८ सह-वाहतूक निरीक्षक मार्ग तपासणीसाठी कार्यरत होते. अपहर प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात सांगितले.
एसटी मध्ये ट्रायमॅक्सचीच इलेक्ट्रोनिक तिकिटे
राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रोनिक तिकीट यंत्रणेच्या करारासंदर्भात आमदार आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, इलेक्ट्रोनिक तिकीट यंत्राच्या संदर्भात ट्रायमॅक्स या कंपनीशी करार करण्यात आल असून पहिला करार १० डिसेंबर २०१४ ला संपला आवश्यक बाब म्हणून याच कंपनीशी करार करून या कराराला एक वर्ष मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment