प्रभावित परिसरातील नागरिकांना नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश
मुंबई / प्रतिनिधी - कांदिवली मधील दामू नगर परिसरातील आगीच्या घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज (दि. ७ डिसेंबर २०१५) तातडीने सदर घटनास्थळाकडे धाव घेऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या पाहणी दरम्यान आयुक्तांनी महापालिकेच्या परिमंडळ ७ चे उपायुक्त अशोक खैरे व आर / दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांना संबंधित परिसरातील नागरिकांना निवारा सुविधेसह आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन निवारा, पाणी इत्यादी सेवा-सुविधांसह इतर सर्व नागरी सेवा सुविधा अत्यंत तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात व त्यासाठी प्रशासकीय परवानग्यांची वाट पाहू नये, असेही आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित उपायुक्त अशोक खैरे यांना दिले आहेत. या पाहणी दौ-याच्यावेळी महापालिका आयुक्तांसमवेत उपायुक्त (आयुक्त) रमेश पवार हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment