मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 15 डिसेंबर –
मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंखेप्रमाणे मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. मुंबईत दाटीवाटीने झोपडपट्ट्यांही उभ्या राहिल्या आहेत. अशा वेळी एखादी आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची वाहने दुर्घटेनच्या ठिकाणी पोहचणे अशक्य होते. परिणामी,मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होत होती. यावर उपाय म्हणून यापूर्वी रस्त्यांवरील नळखाबांचा वापर केला जात होतो. परंतु, काही वर्षापूर्वी हे नळखांब बंद करण्यात आले. यावरून पालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका प्रशासनाला पालिका महासभेत चांगलेच धारेवर धरले होते.
ब्रिटिशकाळात मुंबईत 10 हजार 220 नळखांब होते. रस्ते धुण्यासाठी व आग विझवण्यासाठी याचा वापर केला जात होता. परंतु, बांधकामे व रस्ते दुरुस्तींमुळे निम्मे नळखांब जमिनीखाली गाडले गेले आहेत. तर 90टक्के नळखांब बंद अवस्थेत आहेत. मुंबईतील वाढत्या आगीच्या घटना लक्षात घेता हे नळखांब तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी नगरसेवक फय्याज अहमद खान यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. मुंबईतील सरकारी कार्यालये, मोठी रुग्णालये, महत्वाचे इमारतींजवळ असलेले व बंद पडलेलेफायर हायड्रंटची दुरुस्ती करून ते पुनर्जिवीत केले जाणार आहेत. तसे आदेश जलविभागाला दिल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment