ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप सर्वच सणांसाठी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2015

ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप सर्वच सणांसाठी

  • मुंबई : ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप केवळ गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता, सर्वच धार्मिक सणांवेळी करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रांच्या वेळी वाजवण्यात येणाऱ्या ढोल-ताशांच्या आवाजावरही निर्बंध घालण्याची सूचनाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. सणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत असल्याने, राज्य सरकार व महापालिकांना संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्याचे रहिवासी महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad