तरीही नसबंदी करण्याच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर
मुंबईमधे सतत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी आणि मृत पावणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना दुप्पट रक्कम देवून कुत्र्यांच्या नसबंदी करण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीमधे मंजूरी देण्यात आली.
मुंबईमधे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सतत वाढत आहे. भटके कुत्रे मारन्यास न्यायालयाची बंदी आहे. अश्या परिस्थितीमधे मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 2 कोटी 64 लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. यामधे नंतर 56 टक्यांची वाढ करत 4 कोटी 14 लाखांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यापैकी पालिकेने अद्याप 3 कोटी 95 लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्या नंतर पालिकेकडे 18 लाख रुपये शिल्लक राहिले आहे.
सन 2014 साली कुत्र्यांच्या जनगणने प्रमाने 11262 मादी आणि 14671 नर कुत्र्याची अद्याप नसबंदी बाकी आहे. यापैकी 10 हजार मादिनी गेल्या 2 वर्षात 50 हजार कुत्र्याना जन्म दिला आहे. एकूण 64 हजार 671 कुत्र्यांची नसबंदी 600 रुपये दराने 3 कोटी 90 लाख रुपयांची गरज आहे. पालिकेकडे 18 लाख 80 हजार रुपये शिल्लक असल्याने 2 कोटी 81 लाख रुपये जस्तिची मंजूरी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव स्थायी समितीत आणण्यात आला होता.
यावर बोलताना किती लोकाना रेबीज झाले किती लोकाना कुत्रे चावले याची माहिती स्थायी समितीत सादर करावी अशी मागणी डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी केली. विनोद शेलार यांनी कर्मचारी नसल्याने श्वान पकडले जात नसल्याचे सांगत रिक्त पदांची आकडेवारी सादर करावी अशी मागणी केली. तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी भटक्या आणि पालीव कुत्र्याना लेप्टोस्पायरेसिसचे इंजेक्शन द्यावे अशी सूचना केली. यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यानी सन 2013 मधे 81716 लोकाना कुत्र्याने चावा घेतला यावेळी 8 लोकांचा मृत्यु झाला. सन 2014 मधे 81165 लोकाना कुत्र्याने चावा घेतला यावेळी 3 लोकांचा मृत्यु झाला. सन 2015 मधे 58317 लोकांना कुत्र्याने चावा घेतला असून यावर्षी 5 लोकांचा मृत्यु झाला असल्याची माहिती दिली.
No comments:
Post a Comment