मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 14 डिसेंबर –
यंदा टाटा रुग्णालय व इम्पॅक्ट फाऊंडेशनने विविध संस्थेकडून उपचारासाठी १४ कोटींचा निधी जमा केला आहे. त्यातून १,६०० लहान मुलांच्या पालकांना आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. दारिद्रय़ रेषेखालील ८० टक्के रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहे.
कर्करोगावर उपचारासाठी खेडोपाडय़ातून येणाऱ्या लोकांचे प्रमाण ८० टक्के आहे. अनेकदा उपचारासाठी पैसे नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होतात. अशा रुग्णांना टाटा रुग्णालयाने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा खर्च राजीव गांधी जीवनदायी योजना, पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीतून तसेच गैरसरकारी स्वयंसेवी संस्थेद्वारे जमा केला जातो. हा निधी गोळा करण्यासाठी ३ ऑक्टोबर २०१० रोजी इम्पॅक्ट फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.
या संस्थेतर्फे गरजू रुग्णांना उपचाराचा खर्च व उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांना राहाण्यासाठी धर्मादाय आश्रमात सोय करून देणे, आहाराची व्यवस्था आणि रक्ताची गरज भासल्यास ते उपलब्धही करून दिले जात आहे. कर्करोगाने ग्रस्त लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रुग्णालयात कर्करोगग्रस्त मुलांसाठी शाळाही भरवण्यात येत असल्याचे रुग्णालयाच्या बाल कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बनवली यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment