मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. १० डिसेंबर (प्रतिनिधी) – नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने संकेतस्थळावर मान्यता नसलेल्या संस्थांची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये मुंबई विभागातील ६४ संस्था आहेत या संस्थाना त्रुटीबाबत नोटीस बजावण्यात आलेली असून या प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यात काही तंत्रशिक्षण संस्था या मान्यता प्राप्त नसून यांच्याकडून विद्यार्थ्यांची फसवणूक होण्याची भीती व्यक्त करत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला दिलेल्या लेखी उत्तरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश इच्छुक असणा-या विद्यार्थ्यांची मान्यता प्राप्त नसलेल्या संस्थेत प्रवेश घेऊन फसवणूक होऊ नये म्हणून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने डिसेंबर २०१४ मध्ये अशा संस्थांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. एकूण ६९ संस्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये ६४ संस्था मुंबई विभागातील आहेत, संबंधित संस्थाना त्रुटीबाबत नोटीसा बजावण्यात आल्या असून अशा संस्थामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन नये म्हणूनच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment