मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - बृहन्मुंबई महानगरपालिकेने मक्त्याने दिलेल्या भूभागांबाबत (Lease-hold plot) हस्तांतरण, नूतनीकरण, पुनर्विकास इत्यादी बाबींच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले प्रस्तावित धोरण जनतेच्या माहितीसाठी तसेच सूचना व हरकतींसाठी महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या धोरणावर काही सूचना व हरकती असल्यास नागरिकांनी त्या गुरुवार दि. १७ डिसेंबर २०१५ पर्यंत महापालिकेच्या मालमत्ता खात्यास पाठवाव्यात असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता खात्याच्या काही धोरणाविरोधात मक्तेदारांनी (Lessee) न्यायालयात न्यायालयीन दावे दाखल केल्याने व तसेच न्यायालयाचे अंतरिम आदेश विचारात घेता मालमत्ता खात्याच्या भूभागांबाबत मक्त्यासंबंधी धोरणांमध्ये सुधारणा करण्याबाबत महापालिकेने ठरविले आहे. सदर प्रस्तावित धोरणाच्या मसुद्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावित धोरणाचा मसूदा जनतेच्या माहिती तसेच सूचना व हरकतींसाठी महापालिकेच्याwww.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर 'Estate Policy Draft 2015' या लिंक अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रस्तावित धोरणाबाबत काही सूचना व हरकती असल्यास नागरिकांनी त्या १७ डिसेंबर २०१५ पर्यंत महापालिकेच्या मालमत्ता खात्याला ac.estate@mcgm.gov.in या इ-मेल पत्त्यावर किंवा सहाय्यक आयुक्त (मालमत्ता), बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत,फोर्ट मुंबई- ४०० ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment