पालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालतचे आयोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2015

पालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालतचे आयोजन

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - मुंबई महापालिकेशी निगडित दावे निकाली काढण्यासाठी १0 व ११ डिसेंबर रोजी महानगर दंडाधिकारी, ३९, ५५वे न्यायालय विलेपार्ले तसेच ४१ व ४२वे न्यायालय शिंदेवाडी, दादर (पूर्व) येथे 'विशेष मोहीम' हाती घेण्यात येणार आहे. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने मुंबई महापालिका व इतर अधिनियमांतर्गत दाखल केलेले दावे निकाली काढण्यात येणार आहेत. संबंधितांनी या तीनही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत न्यायालयात स्वत: उपस्थित राहावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad