मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 30 Dec 2015
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेसाठी पाठवायच्या दोन जागांसाठी अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कदम व काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विजय मिळविला आहे.
मुंबईतील दोन जागांसाठी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची बुधवारी मतमोजणी झाली. रामदास कदम यांनी ८५ मते मिळवीत विजय मिळविला. तर, भाई जगताप यांना ५८ तर राष्ट्रवादीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांना ५६ मते मिळाली. राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांचा अवघ्या २ मतांनी पराभव झाला आहे. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छुप्या युतीचे दर्शन या निकालावरून दिसून आले. मुंबई महापालिकेत शिवसेनेच सर्वाधिक नगरसेवक असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता. खरी चुरस दुस-या जागेसाठी होती. पडद्यापाठून भाजपने मदतीचा हात दिल्यामुळे प्रसाद लाड यांनी ५६ मतांपर्यंत मजल मारली अशी चर्चा राजकीत वर्तुळात सुरु आहे. निकालानंतर प्रसाद लाड यांनी पराभव मान्य करुन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. प्रसाद लाड यांच्या पारड्यात भाजपची ३२ पैकी किमान २५ ते २८ मते पडल्याची शक्यता असून समाजवादी, अपक्ष आणि कॉंग्रेसच्या काही मोजक्या मतदारांना फोडण्यात लाड यांना यश आल्याचे दिसत आहे. दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २०१ नगरसेवकांनी मदतानाचा हक्क बजावला.
No comments:
Post a Comment