मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ९ डिसेंबर
एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या वर्षभराच्या कालावधीत राज्यात तब्बल ७९९ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून त्यामध्ये ४० कर्मचा-यांचा देखील समावेश असल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजपा आमदार आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली.वीज वितरण यंत्रणेतील दोष सुधारण्यासाठी अद्यावत यंत्रणा नसल्यामुळे विजेच्या यंत्रांची हाताळणी करताना अनेकांचा मृत्यू होतो, ही माहिती खरी आहे का असा तारांकित प्रश्न आमदार आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात उर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात ७९९ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये ४० कर्मचारी व बाहेरील व्यक्ती ७५९ आहे. तर विद्युत सुरक्षेबाबत महावितरण कंपनीकडून ग्राहक व जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम व प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असून सुरक्षेविषयी मार्गदर्शन करणारे १०० कार्यक्रम आयोजित करण्याचा कृती आराखडा तयर करण्यात आली माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment