मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ९ डिसेंबर
कांदिवली दामू नगर येथील आग लागली की लावण्यात आली? हा घातपात आहे का? अशा प्रश्नांसह याच झोपडपट्टी परिसरात एसडी कार्पोरेशन यांचा पुनर्विकासाचा प्रस्ताव होता त्यामुळे त्यांच्याकडेही येथील स्थानिक रहिवाशी संशयाने पाहत आहेत, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी स्वतः त्या जागेवर गेल्यावर अशा चर्चा येथे ऐकल्या त्यामुळे या आगीची चौकशी करण्यात यावी, ही मागणी मी सरकारकडे केली आहे, अशी माहिती आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज नागपूर येथे दिली.विधानसभेमध्ये आज दामुनगर मधील लागलेल्या झोपडपट्टी बाबत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी निवेदन केले, मात्र त्याचवेळी कॉंग्रेस राष्ट्रवादी गोंधळ घालत होते. याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, दामूनगर आगी प्रकरणी मंत्री सभागृहात अत्यंत संवेदनशीलपणे निवेदन करत होते मात्र त्याचवेळी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य गोंधळ घालत होते. त्यांचा हा अत्यंत असंवेदनशीलपणा दिसून आला. याआगी मधील मृत झालेल्या आणि संसार उध्वस्त झालेल्या कुटुंबांबाबत संवेदनशीलपणे सरकार निवेदन करत असताना कॉंग्रेस राष्ट्रवादीने घातलेल्या गोंधळाचा आम्ही निषेध करतो, अशा असंवेदनशील वागण्यामुळे दामूनगर मधील रहिवाश्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कॉंग्रेस राष्ट्रवादीने केले आहे अशी टीका त्यांनी केली.
सरकारने या झोपडपट्टीत राहणा-या रहिवाश्यांना एक महिन्यात पक्की घरे देण्याबाबत पाऊले उचलण्यात येत आहेत त्याची माहिती दिली तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली आहे. त्या झोपडपट्टीच्या जागेबाबत काम करणा-या पाच शासकीय विभाग आहेत त्यांनी एकत्रितपणे काम करून पुढच्या आठ दिवसात अहवाल द्यावा असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे, त्यामुळे या रहिवाश्यांना दिलासा देणारे काम केल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
दरम्यान ही आग घातपात असावी अशी शंका तेथील रहिवाशांकडून उपस्थित केली जात आहे. मंगळवारी घटना स्थळी भेट दिल्या नंतर स्थानिकांनी माझ्याशी बोतलाना मनातील अनेक शंका बोलून दाखविल्या. याच झोपडपट्टीमध्ये पुनर्विकासाठी एस.डी. कार्पोरेशन या विकासकाचा प्रस्ताव होता. त्यामुळे त्यांनीच ही आग लावली नाही ना ? अशी शंका काही रहिवाश्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे या एस.डी. कार्पोरेशनची आणि त्याला मदत करणारे नेमके कोण आहेत यासह या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली.
No comments:
Post a Comment