महापालिकेद्वारे ४ दिवसात ६१९ मेट्रीक टन कचरा जमा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2015

महापालिकेद्वारे ४ दिवसात ६१९ मेट्रीक टन कचरा जमा

मुंबई // प्रतिनिध - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असणारी अखंड श्रध्दा, नितांत आदर आणि अखंड प्रेम यापोटी संपूर्ण देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील महापरिनिर्वाण दिनी मुंबईतील चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आपले श्रध्दा सुमन अर्पित केले. या सर्व अनुयायांना आवश्यक त्या विविध नागरी सेवा सुविधा देण्याचे कार्य बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सक्षमपणे पूर्ण करण्यात आले. या सेवा सुविधा देण्यासाठी महापालिकेचे २०० अधिकारी आणि ६००० कर्मचारी कार्यरत होते.


दि. ३ डिसेंबर पासून ते ७ डिसेंबर २०१५ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत दादर परिसरात महापालिकेद्वारे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. अव्याहतपणे चाललेल्या या मोहिमेदरम्यान संबंधित परिसरातून महापालिकेद्वारे एकूण ६१९ मेट्रीक टन कचरा जमा करण्यात येऊन स्वच्छता व साफ सफाई नियमितपणे ठेवण्यात आली.

हे सर्व नियोजन व व्यवस्था अधिकाधिक योग्य प्रकारे करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनात परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद वागराळकर आणि जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार, जी/उत्तर विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मुंबईत येणा-या लाखो अनुयायांना अधिकाधिक चांगल्या सोयी-सुविधा देता याव्यात व त्यांचे मुंबईतील वास्तव्य अधिकाधिक सुखकर व स्मरणीय व्हावे, यासाठी दि. ३ ते ७ बृहन्मुंबई महानगरपालिका अहोरात्र कार्यरत होती. महापरिनिर्वाण दिनाच्या किमान तीन महिने आधीपासून या सर्व बाबींचे नियोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad