रेल्वे प्रवाशांच्या बॅगा पळवणारी टोळी अटकेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2015

रेल्वे प्रवाशांच्या बॅगा पळवणारी टोळी अटकेत

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 14 डिसेंबर – 
रेल्वे प्रवाशांच्या बॅगा लंपास करणाऱ्या एका सराईत टोळीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली. या टोळीने काही महिन्यांमध्ये अनेक प्रवाशांच्या बॅगा लंपास केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. 
कुर्ला येथे राहणारे दिनेश जैस्वाल कुटुंबीयांसह 17 नोव्हेंबरला कुशीनगर एक्‍स्प्रेसने त्यांच्या गावी जात होते. रात्री 9च्या सुमारास ते लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाले. गाडी फलाटावर येताच त्यांनी सामानाच्या बॅगा सीटवर ठेवल्या. गाडीतील दिवे सुरू नसल्याने अंधार होता. हीच संधी साधत अनोळखी चोरट्यांनी त्यांची एक बॅग लंपास केली. बॅगेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि काही रोख रक्कम असा एकूण एक लाख 23 हजारांचा मुद्देमाल होता. जैस्वाल यांनी तत्काळ कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. जैस्वाल यांचा बॅगेत असलेला मोबाईल सुरू होताच पोलिसांना त्याचे लोकेशन समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपी वसंतलाल यादव याला पकडले. त्याने सुनील यादव, सुशील यादव आणि शरिफ शेख या त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तिघांना कुर्ला परिसरातून बेड्या ठोकल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad