मुंबई असुरक्षित - प्रजा फौंडेशनच्या अहवालात मुंबईमधील गुन्हेगारीवर ताशेरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2015

मुंबई असुरक्षित - प्रजा फौंडेशनच्या अहवालात मुंबईमधील गुन्हेगारीवर ताशेरे

बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ३९० टक्के वाढ 
विनयभंगाच्या प्रकरणामध्ये ३७४ टक्के वाढ 
पोलिसांची ११ टक्के पदे रिक्त 
मुंबई / अजेयकुमार जाधव / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 
प्रजा संस्थेचा अहवाल मंगळवारी मुंबई प्रेस क्लब येथे जाहीर करण्यात आला. या अहवालात मुंबई आता पूर्वीसारखी सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. सन २०१०-२०११ ते २०१४-१५ या कालावधीत बलात्काराच्या घटनांमध्ये ३९० तर विनयभंगाच्या प्रकरणात ३४७ टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. २०१३-१४ ते २०१४-१५ पासून बलात्काराच्या प्रकरणात ४९ तर विनयभंगाच्या प्रकरणामध्ये ३९ टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. बलात्काराचा आरोप केवळ २७ टक्के सिद्ध होत असल्याचे प्रजाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपपत्र दाखल होत असतात. पुरेसे पुरावे आणि गुन्ह्याची साक्ष देणारे असले तरच खटले भरले जातात तरीही गुन्हा सिद्ध होण्याचा दर कमी असल्याचेप्रजाचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या सत्र न्यायालयात प्रजा फौंडेशनने सर्व्हेक्षण केले. या न्यायालयात कायद्यानुसार अतिशय गंभीर गुन्ह्यांची प्रकाराने न्याय प्रवरिष्ठ असतात. परजणे अभ्यासलेल्या ५५० प्रकरणापैकी केवळ १२७ प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाले आहेत. साक्षीदार उलटल्यास खोट्या साक्षीची सुरुवात केली जात नाही. बलात्कारासारख्या घटनांमध्ये आरोप सिद्ध होण्यास आठ महिने लागतात. तपासात अपयश, दुबळा फिर्यादी पक्ष, सुधारणा घडवूनही दुबळी यंत्रणा असे निरीक्षण नोंदवण्यात आल्याचे मेहता म्हणाले.सन २०१४ मध्ये शरीराशी निगडीत आरोप सिद्ध होण्याचे प्रमाण फक्त ९ टक्के होते असे या अहवालात नमूद करण्यात आले. 


सन २०१४च्या हिवाळी आणि २०१५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी या वास्तवतेकडे पाठ फिरवली आहे. ३१ पैकी ४ आमदारांनी गुन्हे विषयक एकही प्रश्न विचारेला नाही. बलात्कारासंबंधी केवळ ६ प्रश्न विचारण्यात आले. वायव्य मुंबई मधील चार आमदारानी गुन्ह्याबाबत फक्त ९ प्रश्न विचारले आहेत. २०१४-२०१५ मध्ये ९० पोलिस अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली.पोलिस दलात अजूनही ४३९२ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. एकूण पोलिस दलाच्या ११ टक्के पदे रिक्त आहेत. पोलिस दलाच्या कंट्रोल रूममध्येही ५१ टक्के कर्मचारी कमी असल्याचे प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी सांगितले. सरकार स्मार्ट शहराबद्दल बोलत आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक स्मार्त शहरे प्रस्तावित असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. कोणत्याही स्मार्ट शहराचे वातावरण सुरक्षित आणि संरक्षित पाहिजे. मुंबई शहर स्मार्ट सिटीच्या शर्यतीकरिता उत्सुक असेल तर प्रशासन आणि धोरणकर्त्यांनी मुलभूत सुरक्षा आणि सरक्षणाकडे प्राधान्याने विचारात घेतले पाहिजे असे आवाहन निताई मेहता यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad