केईएम रूग्णालयात अरूणा शानभाग निर्भया सेंटर सुरू करा - आमदार अॅड आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2015

केईएम रूग्णालयात अरूणा शानभाग निर्भया सेंटर सुरू करा - आमदार अॅड आशिष शेलार

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 21 Dec 2015
केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागा मार्फत रुपये ३००० कोटींची तरतूद निर्भया योजने अंतर्गत करण्यात आली आहे. या निधीतून केईएम रूग्णालयात प्रस्तावित अरूणा शानभाग निर्भया सेंटर तातडीने सुरू करावे  अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.


गेली दोन वर्षे या विषयावर  आमदार अॅड आशिष शेलार यांनी पाठ पुरावा करीत असून आज औचित्याच्या मुद्द्या द्वारे त्यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा मांडला. 
आमदार अॅड आशिष शेलार यांनी यामध्ये म्हटले आहे की,केंद्र सरकार च्या महिला व बाल कल्याण विभागा मार्फत रुपये ३००० कोटींची तरतूद निर्भया योजने अंतर्गत करण्यात आला आहे. शासना तर्फे अद्याप आवश्यक तितका वापरला गेलेला नाही. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालय येथे महिलांचा लैंगिक छळबलात्कार अशा लैंगिक हल्ल्यात बळी पडलेल्या पिडीत महिलांवर व मुलींवर तातडीने उपचार करण्यासाठी व त्यांचे मानसिक मनोबल वाढविण्यासाठीसमुपदेशन करण्यासाठी स्वर्गीय अरुणा शानबाग यांच्या नावाने एक्सलन्स केंद्र (Centre of Excellence for Victim Centric comprehensive care for Survivors of sexual assault) सुरु करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यासह घेण्यात आलेल्या बैठकीचा सविस्तर प्रस्ताव के.ई.एम. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना सादर केला असून सद्यस्थितीत हा प्रस्ताव केंद्रीय गृह विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग यांच्याकडे पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे याला विलंब होत असून  लैंगिक छळात बळी पडलेल्या महिलानां त्वरित उपचार मिळण्यासाठी सदर केंद्र सुरु करण्यासाठी शासनाने तातडीने अत्यंत महत्वाचा असलेल्या या विषयावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad