पालिका आयुक्त म्हणतात, खर्चाचा टक्का वाढणार - तीव्र पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2015

पालिका आयुक्त म्हणतात, खर्चाचा टक्का वाढणार - तीव्र पडसाद


मुंबई - महापालिकेचा अवघा 21 टक्के निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी गटनेत्यांच्या बैठकीत उमटले. त्यावर या महिन्यात मोठ-मोठ्या कामांसाठी निविदा मागविण्यात येणार असून, त्यानंतर हा खर्चाचा टक्का वाढेल, असे आयुक्तांनी सांगितले; मात्र पुढील वर्षापर्यंत शहरातील विकास कामे होणारच नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला.
महापालिकेने 2015-16 या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी 11 हजार 816 कोटींची तरतूद केली होती. त्यातील फक्त दोन हजार 552 कोटी खर्च करण्यात आले आहेत. त्यावरून गटनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनावर हल्ला चढवला. गतवर्षीपेक्षा 10 टक्के जास्त निधी खर्च झाला असून, या महिन्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निविदा मागविण्यात येणार आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात हा खर्च वाढलेला दिसेल, असे आयुक्त मेहता यांनी सांगितले.

आयुक्तांच्या या आश्‍वासनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. आता निविदा मागविल्या जातील. ती कामे मंजूर होईपर्यंत मे उजाडेल. त्यानंतर पावसाळ्यात कामे सुरू होणार नाहीत. पावसाळ्यात सर्व कामे एकत्र सुरू होऊ शकत नाहीत. त्यानंतर फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागतील. मग कामे कशी होतील, असे म्हणत त्यांनी प्रशासनाला खिंडीत गाठले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad