भारत पेट्रोलियम तेल शुध्दीकरण सयंत्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2015

भारत पेट्रोलियम तेल शुध्दीकरण सयंत्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (मुंबई रिफायनरी क्रुड डिस्टिलेशन युनिटच्या) कच्चे तेल शुद्धीकरण सयंत्राच्या लोकार्पणामुळे इंधन स्वयंपूर्णतेसंदर्भातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली असून, या नव्या सयंत्रामुळे पर्यावरणाचे जतन व संवर्धन होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. 
चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या 6.0 मिलियन मेट्रीक टन प्रती वर्ष क्षमता असलेल्या 1419 करोडच्या मुंबई रिफायनरी क्रुड डिस्टीलेशन युनिटचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. या सोहळ्यास पेट्रोलियम तथा प्राकृतिक गॅस राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान (स्वतंत्र प्रभार), दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश फातर्पेकर, पेट्रोलियम प्राकृतिक गॅसचे सचिव के.डी.त्रिपाठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रबंधक व निदेशक एस. वरदराजन तसेच भारत पेट्रोलियमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, या नव्या सयंत्रामुळे पर्यावरण संतुलीत राहिलच त्याचबरोबर ऊर्जेचा उपयोग योग्य पद्धतीने होण्यास मदत होणार आहे. ऊर्जेची 30 टक्के बचत होऊन वर्षाला 128 करोड रुपयांची बचत होणार आहे. यामुळे सरकारी कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पारदर्शकतेवर लोकांचा अधिक विश्वास वाढणार आहे. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही संबोधित केले.

तसेच 2017 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात नविन युनिट सुरू करण्याचा मानस केंद्र सरकारचा असल्याचे त्‍यांनी सांगितले. या नव्या सयंत्र युनिटमुळे राज्याला रोजगार आणि अर्थव्यवस्थेला नवी गती प्राप्त होणार असून विकासाची नवी शृंखलाच तयार होणार असल्याचे सांगून भारत पेट्रोलियमच्या अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन त्‍यांनी केले. असे नव नवीन प्रकल्प देशातच राहिले तरच रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि भविष्यात जर असे प्रकल्प राज्यात सुरू झाले तर राज्याला यशाच्या शिखरावर नेण्यास सहकार्य मिळणार आहे. तसेच, यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची दादर येथील ज्योत अखंड सुरू ठेवण्याचे कार्य भारत पेट्रोलियम करेल, असे आश्वासित केले. के.डी.त्रिपाठी यांनी यावेळी सयंत्राची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad