गुजरातचे न्यायाधीश जे एस पारधिवालांना त्वरित निलंबित करा --- रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2015

गुजरातचे न्यायाधीश जे एस पारधिवालांना त्वरित निलंबित करा --- रामदास आठवले

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 19 Dec 2015

मागासवर्गीयांना देण्यात आलेल्या आरक्षणामुळे देशाचे नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त करुन आरक्षणाविरुद्ध गरळ ओकणारे गुजरातचे न्यायाधीश जे एस पारधिवाला  यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. 

न्यायाधीश पारधिवाला यांनी आरक्षणाविरुध्द विचार मांडून घटनेचा अवमान केला आहे मागासवर्गीयांना संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या अधिकाराविरुद्ध बोलणे हा घटनाद्रोह असून अश्या न्यायाधीशांकडून मागासवर्गीयांना काय न्याय मिळणार?असा सवाल करुन खासदार आठवले यांनी  जे एस  पारधिवाला यांना तात्काळ न्यायाधीश पदावरून निलंबित करण्याची मागणी केली आहे या बाबत आपण राज्यसभेत विषय मांडणार असल्याचे खासदार आठवले म्हणाले. 

न्यायपालिका सवतंत्र आहे न्यायालयात सर्वांना समान न्याय मिळेल कायदयासमोर सर्व समान आहेत यावर भारतियांचा विश्वास आहे मात्र पारधिवाल सारखे आरक्षणांचे विरोधक न्यायाधीश असले तर मागासांना त्यांच्याकडून निष्पक्षपणे न्याय कसा मिळेल पारधिवालसारख्या न्यायाधीशांमुळे न्यायाधीशांच्या प्रतिमेवर कलंक लागला असल्याची टिका खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. 


रिपब्लिकन पक्षाची भारत भीम यात्रा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे "जाती तोडो, समाज जोडो समता अभियान‘ ही मोहीम देशभरात राबवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून "भारत भीम यात्रा‘ काढण्यात येणार आहे. पक्षाध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

26 जानेवारीला कन्याकुमारी येथून या यात्रेची सुरुवात होईल. देशभरात फिरून या यात्रेचा समारोप मध्य प्रदेशातील महू येथे 24 एप्रिल 2016 रोजी होईल. समारोपाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या यात्रेसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे समता रथ तयार करण्यात आला आहे.

आठवले तामिलनाडूच्या दौऱ्यावर
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले रविवारी दि 20 डिसेंबर रोजी  तामिलनाडुचा दौरा करणार आहेत. तेथील पुरग्रस्तांच्या भेटी घेवून तेथे चाललेल्या मदतकार्याचा आढावा घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या तामिलनाडु शाखेच्या वतीने ही विविध ठिकाणी पुराग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. तामिलनाडुतील कडलूर आणि चेन्नई येथे खासदार रामदास आठवले भेट देणार आहेत. आपले वेतन तामिलनाडुच्या पुराग्रस्तांच्या मदतीसाठी देणारे रामदास आठवले राज्यातील पाहिले खासदार ठरले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad