आगीत ख़ाक झालेल्या कांदिवलीतील झोपड़पट्टिचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा -- रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2015

आगीत ख़ाक झालेल्या कांदिवलीतील झोपड़पट्टिचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा -- रामदास आठवले

कांदिवलीतील दामुनगर मध्ये लागलेल्या भीषण आगीत 2हजारहुन अधिक झोपड्या जळून ख़ाक झाल्या आहेत गोरगरीब झोपड़ीवासियांचे संसार उघड्यावर आले आहेत त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी तसेच जाळालेल्या झोपड़पट्टीचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी केली.


आज सकाळीच खासदार आठवलेंनी जळालेल्या दमुनगर झोपड़पट्टीला भेट देवून गोरगरीब झोपड़ीवासियांचे सांत्वन केले यावेळी खासदार आठवलेंसमवेत रिपाइंचे मुम्बई अध्यक्ष गौतम सोनवणे हरिहर यादव महेंद्र शिर्के फिरोझ अली फारुखी हेमंत रणपिसे प्रवीण मोरे आदि पदाधिकारी सोबत होते. जळालेल्या दामुनगर झोपड़पट्टीला भेट दिल्यानन्तर खासदार आठवलेंनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी दुराध्वनीद्वारे संपर्क साधुन दामुनगर झोपड़ीवासियांना आर्थिक मदत तात्काळ करण्याची मागणी केली या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या दोन झोपड़ीवासियांना सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित द्यावी तसेच जखमींनाही आर्थिक मदत शासनाने देण्याची मागणी आठवलेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad