मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 21 Dec 2015कांदिवली येथील आगीत भस्मसात झालेल्या दामू नगर मधील रहिवाश्यांना किती मदत करावी त्यांचे पुनर्वसन कुठे व्हावे याबबत स्थानिक आमदार त्या खात्याचे मंत्री आणि रहिवाश्यांची कृती समिती यांची महत्वाची बैठक उद्या दिनांक २२ डिसेंबर रोजी घेण्यात येईल तसेच दामू नगर मधील आगीची क्राईम ब्रांच मार्फत चौकशी करण्यात येईल अश्या महत्वाच्या दोन घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केल्या.
विधानसभेत आज मुंबईतील आमदारांनी दामू नगर मधील रहिवाश्यांबाबत ची लक्षवेधी उपस्थित केली होती. या रहिवाश्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत मिळावी व त्यांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे अशी मागणी सर्वच सदस्यांकडून करण्यात आली. याबाबत बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅडआशिष शेलार म्हणाले की आगीत घरे उद्वस्त झालेल्या दामूनगर मधील रहिवाश्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेमदत द्या, तसेच या झोडपट्टीत नावेद आणि सुमेर असे दोन विकासक आले आहेत. त्यापैकी सुमेर या विकासकाने रहिवाश्यांना चांदिवली येथेपुनर्वसन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे यामध्ये मोठा टीडीआर घोटाळा असण्याची शक्यता असून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या याबबत महत्वाची संयुक्त बैठक घेऊन रहिवाश्यांचे म्हणणे व त्यांचे पुनर्वसन तसेच मदत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल तर आगीची क्राईम ब्रांच मार्फत चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले. भाजपा आमदार योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी ही या रहिवाश्यांची बाजू मांडली.

No comments:
Post a Comment