मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. 15 डिसेंबर –
पुढे बोलताना महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, महापालिकेचे विद्यार्थी हे विविध विषयात आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत पोहोचले आहेत. पाठ्यपुस्तक अभ्यासासह इतर विषयातही ते पारंगत आहेत. त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून महापालिका नेहमी प्रोत्साहन देत असते. शिक्षण विभागाच्या कार्यानुभव कलाकृतीचे प्रदर्शन पालिकेच्या सभागृहाच्या आवारात भरविल्याने लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱयांना पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांची माहिती व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. व्यावसायिक कौशल्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या कलाकुसरीद्वारे स्वतःच्या पायावर उभे राहून उज्वल भविष्य घडविता येईल, अशी आशाही महापौरांनी यावेळी व्यक्त केला.
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यानुभव विभागामार्फत विद्यार्थी व कार्यानुभव शिक्षक यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन पालिका मुख्यालयातील सभागृहाच्या बाजूला असलेल्या रिक्त जागेमध्ये दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०१५ या दरम्यान भरविण्यात आले आहे. या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते आज (दिनांक १५ डिसेंबर, २०१५) करण्यात आले. यावेळी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, नगरसेविका प्राजक्ता सावंत, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी, उप शिक्षणाधिकारी डॉ. जीवबा केळुसकर, सिंग, कुलकर्णी हे मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यानुभव विभागाचे निदेशक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी यावेळी सांगितले की, महापौर स्नेहल आंबेकर यांनी शिक्षण विभागाच्या कार्यानुभव विभागाने तयार केलेल्या कलाकुसरीचे विशेष प्रदर्शन महापालिका सभागृहाच्या बाजूला असणाऱया रिक्त जागेमध्ये भरविण्यास प्रशासनास निर्देश दिले होते, त्यानुसार हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment