कांदिवली येथे लागलेली आग म्हणजे झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न - जोगेंद्र कवाडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2015

कांदिवली येथे लागलेली आग म्हणजे झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न - जोगेंद्र कवाडे

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - कांदिवली दामु नगर येथे लागलेली आग म्हणजे झोपडपट्टी बळकाविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे यांनी केला असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे, तर या आगीमागे घातपात असल्याची शक्यता स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनीही  वर्तविली असून, वनविभागाने झोपडीधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात आग कशी लागते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  


वनविभागाने आपली हद्द निश्चित न करता, २००० साली येथील पक्की घरे सरसकट जमिनदोस्त केली होती. कांदिवलीच्या भीमनगर येथील ३६ एकर जागा वनविभागाच्या अखत्यारित येत नाही. याच जागेवर भीमनगर झोपडपट्टी वसली, परंतु २००० साली तत्कालीन वनविभागाच्या जमिनीचा सर्वे न करता. वनसंचालकांनी फक्त घराचा सर्वे करून १९७२ पासूनची पक्की घरे तोडली. हा मुद्दा अंगलट येण्याची चिन्हे असल्यानेच वनविभागाने दिवाळीच्या आधी घाईगडबडीने झोपडीधारकांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर थोड्याच अवधीत अग्निकांडांची घटना घडली असून, यामागे स्थानिकांना पळवून लावण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.  या आगीमागे वनविभागाचे जागा ताब्यात घेण्याचे कारस्थान आहे. १५ वर्षांपासून किरकोळ कारणामुळे आणि पुराव्याचे कारण सांगून, अपात्र ठरविणाऱ्या वनविभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad