मुंबई - गेलीपाच वर्षे महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलच्या भिंतीकडे कुतूहलाने पाहणाऱ्या स्मारकाच्या मागणीच्या घोषणा देणाऱ्या भीमानुयायांना यंदाच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजे डिसेंबर रोजी साक्षात इंदू मिलमध्ये सन्मानाने प्रवेश मिळणार अाहे. त्यामुळे यंदाचा महापरिनिर्वाण दिन ऐतिहासिक असणार आहे.
डिसेंबर २०११ रोजी बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत इंदू मिलमध्ये घुसले होते. त्यांनी २४ दिवस मिलमध्ये ठिय्या देत स्मारकासाठी संपूर्ण मिल देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दरवर्षीचा महापरिनिर्वाणदिन इंदू मिलच्या आंदोलनाच्या भीतीने पोलिसांसाठी मोठा काळजीचा मिषय बनला होता.
महापरिनिर्वाणदिनी आंदोलन होऊ नये, कार्यकर्त्यांनी मिलमध्ये घुसू नये यासाठी मुंबई दरवर्षी पाेलिस मिलच्या दारी मोठा फौजफाटा ठेवत. शीघ्र कृती दलाच्या तुकड्यांपासून फोर्स वनच्या कमांडोंपर्यंतची सारी पथके मिलच्या गेटवर तैनात असायची. तरी कार्यकर्ते आंदोलन करतच, पोलिस नेत्यांना मिलमध्ये प्रवेश देऊन वेळ मारून नेत असत. इतर लोकांच्या नशिबी मात्र इंदू मिलमध्ये जाण्याचे भाग्य नसायचे. ते बापडे इंदू मिलच्या भिंती पाहून समाधान मानायचे. यंदा पहिल्यांदाच सर्वांसाठी इंदू मिल एका दिवसासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे गेली पाच- एक वर्षे ज्या इंदू मिलची आतुरता होती, ती रविवारी याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते११ आॅक्टोबरला इंदू मिल स्मारकाचा पायाभरणी समारंभ झाला. त्या मदवशी इंदू मिल काही तासांसाठी खुली ठेवली होती.यंदाच्या महापरिनिर्वाणदिनी मिल खुली ठेवावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याचे सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. मिल अनेक वर्षे बंद असल्याने सर्वत्र झाडेझुडपे आहेत. पायाभरणी समारंभावेळी मध्यापर्यंत एक रस्ता करण्यात आला होता. सध्या तेथे पायाभरणी समारंभ नामशिला अाणि स्मारकाचा टोपोग्राफिकल आराखडा ठेवला आहे.
No comments:
Post a Comment