मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. ९ डिसेंबर
बेस्ट वीज बिलांमध्ये अचूकता यावी म्हणून कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या प्रणालीचे प्रशिक्षण बेस्ट च्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कारण्यात येत असून उपक्रमाची एक स्वतंत्र नवी प्रणाली तयार करण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.बेस्ट उपक्रमाकडून मेसर्स के.एल.जी. या संस्थेला वीजबिल तयार करण्याचे कंत्राट २००७ साली देण्यात आले, या संस्थेने आर्थिक कारणास्तव प्रवर्तन आणि देखभालीची सेवा पुरविण्या विषयी असमर्थता दाखविल्यानंतर हे कंत्राट मुदतीपूर्वी बंद करण्यात आले व त्याच अटी आणि शर्ती कायम ठेऊन प्रवर्तन आणि देखभालीची सेवा पुरविण्याकरिता मे. त्वस्तर या व्यवसाय संस्थेस दिनांक 2 मे २०१३ रोजी नवीन कंत्राट देण्यात आले. सदर प्रणालीचे प्रवर्तन व देखभाल सध्या या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या संस्थेने कंत्राटांच्या अटी व शर्तीनुसार बेस्ट उपक्रमाच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना त्यांनी तयार केलेल्या प्रणालीचे प्रवर्तन करण्याकरिता आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. ही प्रणाली समजून घेऊन तसेच नवीन प्रणाली तयार करण्याचे काम बेस्ट उपक्रमाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
No comments:
Post a Comment