असंघटीत कामगांरासाठी संत सेवालाल महाराजांच्या नावे महामंडळ स्थापन करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2015

असंघटीत कामगांरासाठी संत सेवालाल महाराजांच्या नावे महामंडळ स्थापन करा

मुंबई, ठाण्यातील नाका कामगारांची सरकारकडे मागणी
राज्यातील असंघटीत आणि बांधकाम, नाका कामगारांच्या नोंदणीसाठी ९० दिवसांची अट पूर्ण करण्यासाठी कोणतेही बिल्डर्स आणि बांधकाम कंपन्या बांधकाम आणि नाका कामगारांना सहकार्य करत नाहीत, यामुळे मागील दोन वर्षांत मुंबई आणि परिसरातील रोज लाखांेच्या संख्येने नाका कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांची सरकारदरबारी नोंद होेत नसून त्यामुळे राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या नाका कामगारांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, यामुळे ही अट शिथिल करून ती ४० दिवसांची करावी आणि बांधकाम, नाका कामगारांसाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटीत कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्या मुंबईतील बांधकाम, नाका कामगारांकडून करण्यात येत आहेत. 

मागील दहा वर्षांपासून राज्यातील बांधकाम, नाका कामगारांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती अभियान राबवणाऱ्या बंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवले जात आहे.  या अभियानाच्या माध्यमातून राज्यासह मुंबई, ठाणे, या परिसरातील असलेल्या सुमारे ३५० हून बांधकाम कामगारांच्या नाक्या-नाक्यांतवर जाऊन  कामगारांमध्ये जनजागृती अभियान राबवले जात असून मंगळवारी मानखूर्द पश्चिमेला असलेल्या बांधकाम कामगारांच्या नाक्यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी बंजारा नाका कामगार संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींसोबतच महाराष्ट्र गाडिया लोहार घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे यांनी यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन  करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. 

यावेळी नाका कामगार हिराबाई राठोड, कमळबाई राठोड आदी ंनी राज्यातील असंघटीत नाका कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावे असंघटीत कामगारांचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. तर सीताबाई राठोड, सुशिलाबाई चव्हाण या मागील अनेक वर्षांपासून नाका कामगार म्हणून काम करत असताना आत्तापर्यंत सरकारकडून त्यांची नोंद करणे दूरच परंतु कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला मिळाला नसल्याची माहिती दिली. तर यावेळी मंगेश सोळंखे यांनी सरकारकडे असंघटीत कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रूपये जमा असतानाही अनेक प्रकारच्या नोंदणीसाठीच्या जाचक अटींमुळे नाका कामगार मोठ्या प्रमाणात सरकारी योजनांपासून उपेक्षित राहिले असल्याने याविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटना, महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाच्या माध्यमातून हे राज्यव्यापी जनजागरण अभियान राबवले जात असल्याची माहिती नाका कामगारांना दिली. नाका कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात असलेल्या  नाक्या-नाक्यांवर जाऊन त्यांच्यात जनजागृती केली जात असल्याची माहिती बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख ॲड. नरेश राठोड यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad