मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा खालावल्याने महापालिका शाळांमधून इंग्रजी माध्यम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांना इंग्रजीचे येणे गरजेचे आहे. शिक्षकांना इंग्रजी यावे म्हणून शिक्षकांना ब्रिटीश कौन्सिलकडून प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतू इंग्रजीच्या प्रशिक्षणासाठी शिक्षक जात असल्याने महापालिका शाळांमधील तब्बल एक हजार वर्ग रिकामे राहत असून यामुळे विद्यार्थ्यांची गळती वाढत असल्याची तक्रार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य शिवनाथ दराडे यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडे केली आहे.
शिक्षकांना इंग्रजी यावे म्हणून शिक्षकांना ब्रिटीश कौन्सिलकडून प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्तेक शाळेतून एका वेळी एक दोन किंवा एकत्र सहा सात शिक्षकांना पाठवण्यात येते. यामुळे शिक्षक नसल्याने वर्ग रिकामे असतात. प्रत्तेक शाळांमध्ये यामुळे ३० ते ४० टक्के अनुपस्थिती असते. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकानाही ट्रेनिंग आणि ट्रेनिंगच्या मिटिंग साठी शाळा सोडून जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची गळती वाढत असल्याची बाब शिवनाथ दराडे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे.यावर पर्याय म्हणून जास्त प्रशिक्षक नेमण्याची, शाळेत जाऊन प्रशिकन देण्याची, व्हर्चुअल क्लासरूम द्वारे प्रशिक्षण देण्याची मागणी दराडे यांनी केली आहे. इंग्रजी किंवा इंग्रजी मधून द्विपदविधर झालेल्या शिक्षकांना असे प्रशिक्षण दिल्यास प्रशिक्षण घेणारा शिक्षक आपल्या शाळांमधील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देवू शकतो असे दराडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment