मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 29 Dec 2015
मुंबई मेट्रो लाइन ३ कुलाबा - वांद्रे - सीप्झ या प्रकल्पाकरिता मेट्रो बांधकाम करण्याकरिता पालिकेचे भूभाग मेट्रो रेल महामंडळ मर्यादित यांना बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारून [ लिजने ] मक्त्याने देण्याबाबतचा प्रस्ताव आज सुधार समितीत राखून ठेवण्यात आला . या विषयावर साधक बाधक चर्चा व्हावी आणि सदस्यांच्या प्रश्नांना आयुक्त , अतिरिक्त आयुक्त तसेच मेट्रो च्या अधिकाऱ्यांनि यासंबंधी सविस्तर माहिती द्यावी , यासाठी विशेष सभा बोलविण्याचा निर्णय यावेळी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी घेतला .
या प्रस्तावावर बोलताना सर्वपक्षीय सदस्यांनी विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली . सदर प्रस्तावासाठी पालिकेच्या अनेक मोक्याच्या जागा मागण्यात आल्या असून यातील काही भूखंड कायमस्वरूपी तर काही तात्पुरत्या स्वरुपात असून आणि त्यावर बांधकाम होणार असल्याने विषय स्पष्ट नसल्याचे निदर्शनास आणले गेले. मेट्रो नक्की कोणासाठी आहे. त्याचा अधिकार पालिकेला द्यावा नाही तर तोट्यात चालणारी बेस्ट हि घ्यावी अशी मागणी कोन्ग्रेस कडून करण्यात आली
कोन्ग्रेस तसेच शिवसेनेकडून सदर विषय महत्वाचा असल्याने यावर सविस्तर चर्चा होण्यासाठी आयुक्तांच्या उपस्तिथित विशेष सभा लावण्यात यावी अशी मागणी केली . यामध्य अनेक त्रुटी असून त्याची पूर्तता कशी करणार हे हि स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणी यावेळी केली गेलि. यावर भा ज प चे मोहन मिठबावकर यांनी मेट्रो शहराला आवश्यक असल्याने सदर निर्णय लवकर घेण्यात यावा , अशी विनंती केली , या चर्चेत राजू पेडणेकर , नौशीर मेहता , सुरेश कोपरकर . श्रद्धा जाधव इत्यादी सदस्यांनी भाग घेतल.
सात उद्याने आणि मैदाने जाणार - दिलीप लांडे
मेट्रो ३ प्रकल्पासाठी १७ भूखंड कायमचे जाणार असून ७ उद्याने व मैदाने ताब्यातून जाणार आहेत. यामध्ये प्रकाश पेठे मार्गावरील कुलाबा वूडस गार्डन , भाटीया बाग , विधानभवन येथील अग्निशमन केंद्राजवळील उद्यान , जे आरडी टाटा मार्गावरील रोटरी उद्यान , हुतात्मा चौकातील उद्यान , ग्रांट रोड जवळील खेळाचे मैदान , साने गुरुजी व नायर रोड चौकातील मनोरंजन मैदान , सिद्धविनायक मंदिराजवळील नर्दुल्ला टंक मैदान व साने गुरुजी मैदान गमविणार असून या बदल्यात पालिकेला काय मिळणार असा सवाल म न से चे ज्येष्ठ नगरसेवक दिलप लांडे यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment