मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही, सिकलसेल व इतर दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना आजाराच्या शेवटच्या टप्प्यात दिलासा देण्यासाठी पॅलेटिव्ह केअर योजनेचा अवलंब महापालिका रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार असून ही योजना राबवण्यासाठी आवश्यक ते सहकार्य संस्थांना करण्यात येणार आहे.
कर्करोग, क्षयरोग, एचआयव्ही, सिकलसेल व इतर दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना आजाराच्या शेवटच्या टप्प्यात दिलासा मिळावा, रुग्णांना व त्याच्या कुटुंबीयांचे मानसिक स्वास्थ ठीक राहावे या दृष्टिकोनातून टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या धर्तीवर ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना राबवण्याची मागणी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली होती. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात वेदना कमी करणारी औषधे मिळण्यात अनेक अडचणी येतात. परिणामी रुग्णाला व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रुग्णांसाठी सरकारच्या आरोग्य विभागाने टाटा मेमोरियल रुग्णालय व सिप्ला पॅलेटिव्ह केअरच्या सहकार्याने डॉक्टर, परिचारिका व बिगर शासकीय संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन ‘पॅलेटिव्ह केअर’ नावाची योजना चार वर्षापूर्वी सुरू केली आहे. त्यामुळे दुर्धर आजाराने शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेल्या हजारो रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment