मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 27 Dec 2015
जीवनविद्या मिशनने हीरक महोत्सवी उत्सवाचा आजचा दुसरा दिवस साजरा केला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथाची १०१ व्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै आणि मातृतुल्य शारदा माई त्याचप्रमाणे विशेष अतिथी म्हणून झी चोवीस तासचे संपादक डॉ उदय निरगुडकर, लोकमत वृत्तपत्राचे संपादक विनायक पातरूडकर, एलएनटीचे संचालक मंडलिक, डॉ अल्का नितू माणके, भूजलतज्ञ सुरेश खानापूरकर, समाजसेवक शिशिर शिंदे, आमदार मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते.
सदगुरूंनी लिहीलेल्या ग्रंथांमधील सहावे अपत्य म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा ग्रंथ. या ग्रंथाने कित्येक जणांचे आयुष्य सुखी केले आहे. अगदी तरूणांपासून साठी गाठलेल्या व्यक्तींना त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देणारे महत्वाचे पुस्तक म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आतापर्यंत या ग्रंथाच्या लाखोप्रती जगभर पोहोचल्या आहेत. प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणारं हे पुस्तक तरूणांच्या पसंतीला पडले आहे. सदगुरूंचं हे पुस्तक जीवनविद्येचं एक दीपस्तंभ ठरलं आहे. परमेश्वर कधी ही कोप आणि कृपा करत नाही हे सदगुरूंनी अधिकारवाणीने सांगितले आहे. जीवनविद्येने कधी ही कर्मकांडाला महत्व दिलं नाही. त्यामुळे सदगुरूंनी तत्वज्ञान मांडल आणि त्याचा स्विकार करून आज लाखो लोकं सुखी झाले आहेत. त्याचप्रमाणे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सदगुरूंनी विश्लेषण करून त्यांच्या ग्रंथात सांगितले आहे.
No comments:
Post a Comment