मुंबईत नव्या पोलीस स्टेशन व चौक्यांसाठी प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षणे असावीत म्हणून आयुक्तांना बैठकीचे निर्देश देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2015

मुंबईत नव्या पोलीस स्टेशन व चौक्यांसाठी प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षणे असावीत म्हणून आयुक्तांना बैठकीचे निर्देश देणार

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 22 Dec 2015   
मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात पोलीस चौक्या , पोलीस स्टेशन यांना आवश्यक असणारी आरक्षणे असावीत यासाठी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

मुंबईतील पोलीस चौक्याच्या उभारणी बाबत विचारण्यात आलेल्या लक्षवेधीवर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यांसाठी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि सध्या शहराचा विकास आराखडा सुरु करण्याचे काम सुरु आहे. अशा वेळी लोकवस्तीच्या आवश्यकते नुसार पोलीस चौकी व पोलीस स्टेशन यांना आवश्यक आरक्षणे विकास आराखड्यात टाकण्यात येतील काय असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारला होता. तसेच सद्याची पोलिसांच्या अस्थापना पदांची निर्मिती १९६२ च्या जनगणनेनुसार करण्यात आली असून ती २०१५ च्या जणगणने नुसार करण्यात येईल का असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन आणि चौक्या यांच्या जागेंच्या उपलब्धतेबाबत पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना संयुक्तपणे बैठक घेण्याचे निर्देश देण्यात येतील तर पोलीस पदांच्या बाबत ही विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad