परिस्थितीजन्य पुरावे बघून घराचा अधिकार अबाधित ठेवा
आमदार अॅड. आशिष शेलार यांची सरकारकडे मागणी
मुंबई दि. ८ डिसेंबर (प्रतिनिधी) – आगीत भस्मसात झालेल्या कांदिवली येथील दामुनागर झोपडपट्टी परिसराला आज सकाळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी भेट दिली, ज्या दोन कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्या त्यांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची मदत भाजपा तर्फे देण्यात आली. तर परिस्थितीजन्य पुरावे पाहून पंचनामेकरून रहिवाश्यांच्या घरांचा अधिकार अबाधित ठेवण्यात यावा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली.
दामुनगर परिसरात उध्वस्त कुटुंबाना वेगवेगळ्या समाजसेवी संस्था आणि काही व्यक्तींकडून मदत करण्यात येत आहे, या सुसूत्रता यावी म्हणून दामूनगर रिलीफ कमिटी सेंटर सुरु करण्यात आले असून माजी आमदार आणि भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रवीण दरेकर तसेच गणेश खणकर यांच्या सहकार्याने हे सेंटर चालविण्यात येत आहे. ज्या दोन कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्या त्यांना प्रत्येकी रुपये ५१ हजार आणि मृतांच्या अंत्यविधीसाठी मदत तत्काळ भाजपा तर्फे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच सोमवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घटना स्थळाची पाहणी केली तर आज आमदार आशिष शेलार यांनी पालकमंत्री विनोद तावडे आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घरांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार करण्यात यावा त्यासाठी एसआरए, वन खाते आणि जिल्हाधिकारी यांचे अधिकारी रीलीफ सेंटरमध्ये बसविण्यात यावे व त्यांनी पंचनामे करावेत अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली, ती मान्य करण्यात आली आहे.
या परिसरात काही मृत प्राणी व त्यांचे अवशेष पडले असल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधून एक मेडिकल कॅम्प या परिसरात लावण्याची मागणी केली तीही आयुक्तांनी मान्य केली आहे. तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि स्वतः प्रवीण दरेकर कालपासूनच घटनास्थळी मदत कार्यात असून रहिवाशांना जेवण पाणी व जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment