मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - दि. १० डिसेंबर (प्रतिनिधी ) - मुंबई उपनगरातील वांद्रे येथील भूखंड महाराष्ट्र शासनाने मे. असोसिएट्स जरनल्स या संस्थेला नेहरू मेमोरिअल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर सुरु करण्यासाठी दिला होता. मात्र या भूखंडावर कमर्शियल बांधकाम करण्यात येत असल्यामुळे सरकारने हा भूखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
आमदार शेलार यांनी मांडलेल्या औचीत्याच्या मुद्द्यात म्हटले आहे की, मुंबई उपनगरातील वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील ३४७८ चौ.मीटर चा भूखंड महाराष्ट्र शासनाने सन १९८३ साली मे. असोसिएट्स जरनल्स या संस्थेला नेहरू मेमोरिअल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर सुरु करण्यासाठी दिला. परंतु या भूखंडावर संस्थे मार्फत कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नसून सन २०१३ साली महानगरपालिके कडून याठिकाणी कमर्शियल इमारत बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली. महानगरपालिकेच्या परवानगीमध्ये ज्या कारणासाठी हा भूखंड देण्यात आला होता त्याचा कोणताही उल्लेख नसून याठिकाणी आता ११ माजली इमारत उभी राहत आहे दिसून आले आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या भूखंडावर नेहरू मेमोरिअल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर सुरु करण्याऐवजी अन्य कारणासाठी सदर जागेचा वापर होत असल्यामुळे आणि अटी व शर्तींचा भंग झाल्याचे दिसून आल्यामुळे हा भूखंड शासनाने त्वरित परत ताब्यात घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment