रेल्वेमधील अपघात - नियम मोडणाऱ्या 483 रेल्वे प्रवाशांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 December 2015

रेल्वेमधील अपघात - नियम मोडणाऱ्या 483 रेल्वे प्रवाशांवर कारवाई

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमध्ये अपघाताचे प्रमाण वाढल्यावर लोकल प्रवासात होणारे अपघात रोखण्यासाठी आरपीएफ पोलिस आणि मध्य रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून नियम तोडणाऱ्यांवर आरपीएफ पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गुरवारी 483 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.  


मुंबईत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अपघातामागे रूळ ओलांडणे, टपावर बसून प्रवास करणे, दरवाजाबाहेर लटकणे ही महत्त्वाची कारणे आहेत. असे प्रकार रोखावेत यासाठी मध्य रेल्वे व रेल्वे सुरक्षा दलातर्फे प्रवाशांना सातत्याने आवाहन केले जात आहे. त्याच वेळी आरपीएफची कारवाई सुरू आहे. बुधवारी 340; तर गुरुवारी 483 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सध्या डोंबिवली, कल्याण, कुर्ला, दादर, सीएसटी या प्रमुख स्थानकांवर ही मोहीम राबवली जात आहे. लवकरच सर्व स्थानकांवर ही मोहीम राबवण्यात येईल. भित्तिपत्रके, बॅनर्सच्या माध्यमातून सुरक्षित प्रवासाचे महत्त्व प्रवाशांना सांगितले जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad