31 डिसेंबरला पश्‍चिम रेल्वेच्या आठ विशेष लोकल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2015

31 डिसेंबरला पश्‍चिम रेल्वेच्या आठ विशेष लोकल

मुंबई / जेपीएन न्यूज ( वेब न्यूज ) - 28 Dec 2015   
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत फिरणाऱ्या प्रवाशांसाठी पश्‍चिम रेल्वेतर्फे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री आठ विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. अप व डाऊन धीम्या मार्गावर या 12 डब्यांच्या विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
चर्चगेट ते विरार दरम्यान रात्री एक वाजून 15 मिनिटांनी, एक वाजून 55 मिनिटांनी, दोन वाजून 25 मिनिटांनी व तीन वाजून 28 मिनिटांनी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. याच लोकल विरारला अनुक्रमे रात्री दोन वाजून 47 मिनिटांनी, तीन वाजून 20 मिनिटांनी, चार वाजता व चार वाजून 55 मिनिटांनी पोचतील. विरार ते चर्चगेट स्थानकांदरम्यान रात्री 12.15 वाजता, रात्री पावणेएक वाजता, एक वाजून चाळीस मिनिटांनी व दोन वाजून 55 मिनिटांनी लोकल सुटतील व या लोकल चर्चगेटला अनुक्रमे रात्री पावणेदोन वाजता, दोन वाजून 17 मिनिटांनी, तीन वाजून 12 मिनिटांनी व साडेचार वाजता पोचतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad