जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर मोठ्या प्रमाणात सहहिस्सेदारांची नावे असल्यामुळे, त्यापैकी बहुसंख्य हिस्सेदार बाहेर गावी रहात असल्याने त्यांची बँक खाती क्रमांक मिळण्यास उशीर होत असे. एकाच कुटुंबातील सामुहिक खातेदारांच्या बाबतीत प्रत्येक बँक खाते क्रमांक आवश्यक होता, काही क्षेत्रास कुळ दाखल असल्याने निधी वाटपात अडचणी आल्या असत्या. काही क्षेत्राची आणेवारी निश्चित नव्हती, एकाच जमिनीवर दोन भिन्न कुटुंबांची नावे होती. या कारणांमुळे नुकसान भरपाई वाटपास विलंब होतो. यावर परिणाम म्हणून आता फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या पंचनाम्याची तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सरपंच, शेजारचे वहिवाटदार यांच्या स्वाक्षरीने आपदग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल, ही यादी ग्रामसभेत वाचून दाखविली जाईल. तसेच चावडीच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्धी करण्यात येणार असून या यादीच्या संबंधाने पंधरा दिवसात हरकती मागविण्यात येतील, हरकती आल्या नाहीत तर ही यादी अंतिम समजून मदत वाटपाची कार्यवाही करण्यात येईल. हरकती आल्यास त्यावर निर्णय घेण्यासाठी मंडळ अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांची समिती निर्णय घेईल, अशी माहिती खडसे यांनी दिली.
आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात निधी जमा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात रु.4 कोटी 19 लाख, पालघर जिल्ह्यात रु.11 कोटी 87 लाख, रायगड जिल्ह्यात रु. 34 कोटी 79 लाख, रत्नागिरी जिल्ह्यात रु.79 कोटी 53 लाख व सिंधुदुर्ग जिल्ह्यात रु.37 कोटी 91 लाख असा निधी वितरित करण्यात आला असून या प्रक्रियेत सुलभता आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment